सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपला सर्वाधिक निधी मिळला आहे. इलेक्ट्रॉल निधीच्या माध्यमातून भाजपला दोनशे कोटीहून अधिक निधी मिळाला आहे. एकूण राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीपैकी तब्बल 80 टक्के निधी हा भाजपला मिळाला आहे. भाजपला सर्वाधिक निधी हा एअरटेल आणि डीएलफ लिमिटेड या कंपन्यांनी दिला आहे.
2019-20 या आर्थिक वर्षात भाजपला 274.45 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तर काँग्रेसला एकूण 58 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. भाजपनंतर तेलंगाणा राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाला सर्वाधिक निधी मिळला आहे.
देशातील 35 राजकीय पक्षांनी आपल्याला मिळालेल्या निधीचा हिशोब निवडणूक आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार तेलंगणा राष्ट्रीय समितीना या पक्षाला 130 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यानंतर व्हायएसआरसीपीला 92 कोटी, बीजू जनता दला 90 कोटी, अण्णा द्रमुकला 89 कोटी, द्रमुकला 64 कोटी तर आम आदमी पक्षाला 49.65 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
0 Comments